Formal letter in marathi (औपचारिक पत्र लेखन मराठी) : बदलत्या काळाच्या ओघात पत्रलेखन ही संकल्पना आपल्याला खूप जुनी आणि वेगळी वाटते. परंतु पूर्वी जेव्हा संदेश वाहनाची इतकी सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा लोक पत्राद्वारे आपले व्यवहार करत होते. तसं पाहायला गेलं तर पत्र लेखन ही एक कला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला पाच गुणांसाठी साठी पत्र लेखन लिहावे लागते. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण औपचारिक पत्र लेखन मराठी (Formal letter in Marathi) माहिती जाणून घेणार आहोत.
दोन लोकांच्या मध्ये व्यक्तिगत संबंध नसतो, कोणतीही ओळख नसते अशा संबंधांना औपचारिक म्हटले जाते. औपचारिक पत्र म्हणजे कोणत्याही व्यवसायाशी निगडीत व्यक्तीला लिहिलेले पत्र. औपचारिक पत्राची भाषा सहज आणि विशिष्ट पूर्ण असते. वास्तवामध्ये आपण कोणतीतरी सूचना, समस्या किंवा इतर कोणत्याही मुद्द्याला घेऊन पत्र लिहीत असतो. औपचारिक पत्र हे कार्यालयीन कामकाजाशी संबंधित असतात.
औपचारिक पत्राचे काही उपप्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे:
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल :
विषय : शरदराव शिंदे प्रशाला, पाच्छापूर या विद्यालयासाठी विज्ञान प्रयोग शाळेत लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र लिहा.
विराज बाबर,
शरदराव शिंदे प्रशाला
पाच्छापूर – 416 404
दि. 14 नोव्हे. 2021
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
गायकवाड विज्ञान साहित्य भांडार,
सांगली – 416 416
विषय : विज्ञान प्रयोगशाळेसाठी उपकरणांची मागणी.
मी शरदराव शिंदे प्रशाला, पाच्छापूर या विद्यालयाचा प्रतिनिधी या नात्याने आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेच्या विज्ञान प्रयोग शाळेसाठी पुढील उपकरणांची व्यवस्था करावी :
अ. क्र. | उपकरणांचे नाव | संख्या |
01 | परीक्षानळी (25Ml) | 20 |
02 | चंबू (1 लिटर) | 10 |
03 | चंचूपात्र (1 लिटर) | 10 |
आपण आपल्या नेहमीच्या व्यापाऱ्यांना जी सवलत देता, ती आम्हालाही द्यावी ही विनंती. मालासोबत बिलही पाठवावे. बिलाच्या रकमेचा धनादेश आपल्याला त्वरित पाठवला जाईल.
आपला विश्वासू,
विराज बाबर,
शरदराव शिंदे प्रशाला,
पाच्छापूर
विषय : शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी शाळेचे मैदान भाड्याने मिळण्यासाठी मागणी करणारे पत्र लिहा. (formal letter in marathi to principal)
विराज बाबर,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शरदराव शिंदे प्रशाला,
पाच्छापूर – 416 404
दि. 14 नोव्हे. 2021
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
जत हायस्कूल,
जत – 416 404
विषय : शाळेचे मैदान भाड्याने मिळण्याबाबत.
मी शरदराव शिंदे प्रशाला, पाच्छापूर या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहीत आहे. आमची शाळा ही आपल्याच परिसरातील एक शाळा आहे. आणि आमच्या शाळेला मैदान नाही ही गोष्ट तुम्हाला तर माहित आहेच. दर वर्षी प्रमाणे आम्ही या वर्षी सुद्ध वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करणार आहोत. त्यासाठी शाळेला पुरेशा मैदानाची आवश्यकता आहे.
या वर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या स्पर्धा 18 व 19 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहेत. त्यासाठी कृपया आम्हाला तुमच्या शाळेचे मैदान दोन दिवसांसाठी भाड्याने द्यावे, ही विनंती. मैदानाचे भाडे व अन्य अटी आम्हाला पत्राद्वारे कळवावेत.
आपला नम्र,
विराज बाबर,
विद्यार्थी प्रतिनिधी,
जत हायस्कूल, जत
हे होते मुख्याध्यापकासाठी लिहिलेले औपचारिक पत्र (letter in marathi to principal)
विषय : मित्राचा दहावीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आला आहे. त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. (मित्राला पत्र लेखन मराठी)
विराज बाबर,
शरदराव शिंदे प्रशाला
पाच्छापूर – 416 404
दि. 14 नोव्हे. 2021
आकाश तुझे मनःपूर्वक अभिनंदन! काल वर्तमानपत्र वाचत असताना तुझा फोटो मला पाहायला मिळाला. तुझा दहावीच्या वर्गात पहिला क्रमांक आला आहे हे वाचून मला खूप आनंद झाला. तुला मिळालेले यश हे खूप कौतुकास्पद आहे.
बरेच दिवस झाले आपलं बोलणं झालं नाही. आशा करतो तू सुद्धा मस्त असशील. आई वडिलांना माझा नमस्कार सांग. पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन… अशीच प्रगती करत रहा. तुझ्या भावी वाटचालीसाठी आणि आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा….
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण औपचारिक पत्र लेखन मराठी (Formal letter in Marathi) जाणून घेतले. हे मराठी पत्रलेखन (Marathi Patralekhan) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.